मुंबई, 10 मार्च 2022: वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने बुधवारी सर्व प्रकारच्या देशांतर्गत क्रिकेटला अलविदा केला. श्रीशांत नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळताना दिसला होता. यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या साखळी फेरीनंतर श्रीशांतने निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामात वेगवान गोलंदाज श्रीशांत मेघालयविरुद्ध मैदानात दिसला होता. मेघालयविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 2 बळी घेतले आणि दुसऱ्या डावात त्याला कोणतेही यश मिळाले नाही. श्रीशांतचा प्रवास वादांनी भरलेला होता.
निवृत्तीची घोषणा करताना त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले, ‘पुढील पिढीच्या क्रिकेटपटूंसाठी… मी माझी प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझा एकट्याचा आहे आणि जरी मला माहित आहे की यामुळे मला आनंद होणार नाही, माझ्या आयुष्यातील या वेळी घेतलेला हा योग्य आणि सन्माननीय निर्णय आहे. मी प्रत्येक क्षण जपला आहे.
For the next generation of cricketers..I have chosen to end my first class cricket career. This decision is mine alone, and although I know this will not bring me happiness, it is the right and honorable action to take at this time in my life. I ve cherished every moment .❤️🏏🇮🇳
— Sreesanth (@sreesanth36) March 9, 2022
भारतासाठी 27 कसोटी सामने खेळलेला, श्रीसंत 2007 साली T20 विश्वचषक विजेत्या संघाचा आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भारतीय संघाचा सदस्य होता. श्रीसंतने मिस्बाह-उल-हकचा झेल घेत भारतीय संघाला टी-20 विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला.
39 वर्षीय श्रीशांतने भारतीय संघासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. याशिवाय श्रीशांतच्या नावावर 74 प्रथम श्रेणी सामने आहेत, या 74 सामन्यांमध्ये श्रीशांतने 213 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 87 विकेट आहेत. क्रिकेटशिवाय श्रीशांतनेही हात आजमावला आहे, त्याने टीव्ही रिअॅलिटी शो तसेच हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये एकूण 4 चित्रपट केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे