पुणे १७ सप्टेंबर, २०२२ : सोनिया गांधी यांच्यानंतर कॅांग्रेसची धुरा कोण सांभाळणार यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. राहुल गांधी या उत्तरावर ठाम शिक्कामोर्तब नाही. पण आपले अस्तित्व दाखविण्याचा राहुल गांधी कसोशीने प्रयत्न करत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून राहुल गांधी नवनवीन संदेश जनतेला देत आहेत. नुकत्याच दिलेल्या संदेशात त्यांनी तरुणांना उज्वल भवितव्य आणि देशांतील तरुणांच्या मनात सकारात्मक विचार निर्माण करणार असा संदेश दिला.
पण हा प्रयत्न कितपत खरा आहे. केवळ काँग्रेस वाचवण्यासाठी भारत जोडो ही यात्रा सुरु केली आहे, अशी चर्चा सध्या जनतेत आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी कॅांग्रेस हा कॅांग्रेसला गिळंकृत करु पाहते, असे चित्र जरी नसले तरी हेतू तोच आहे.
मविआमध्ये कॅांग्रेस नाराज असल्याचं चित्र तर जाहीरपणे दिसून आलंय. त्याबद्दल तर कॅांग्रेस सदस्यांनाच त्यावर जाहीर भाष्य केलं . मग असं असताना भारत जोडो प्रयत्न किती कार्य करणार हे आगामी काळात ठरेल. पण राहुल गांधीची प्रतिमा ठोस करण्यासाठी आणि कॅांग्रेस वाचवण्यासाठी कदाचित सोनिया गांधींना पुन्हा रिंगणात येण्याची दाट शक्यता आहे. हे सत्य पक्षातल्या सदस्यांकडून केवळ औपचारिक रित्या बाहेर येण्याची गरज भासत आहे, हे मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस