राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील साबुर्डी येथिल दत्ता हुरसाळे या शेतकऱ्यांने जनावरांसाठी साठवणूक केलेल्या चाऱ्याच्या वळहीला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे
आग लागल्याची बातमी गावात समजल्यानंतर गावातील स्थानिक नागरिक आग लागलेल्या ठिकाणी आल्यानंतर या नागरिकांकडुन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने संपुर्ण चारा व तीन हापुस आंब्याची झाडे आगीत जळुन खाक झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
सद्या उन्हाळा सुरू आहे आणि त्यामुळे दुपारच्या सुमारास कडक उन्हाच्या झळा लागतात. यामुळे साबुर्डी येथील जनावरांना वर्षभर पुरेल इतका चारा साठवणूक केलेला असताना या चाऱ्याला दुपारी आग लागली आणि या आगीत संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे.
दरम्यान, ऐन उन्हाळ्यात जनावरांना साठवणुक केलेला चारा जळुन खाक झाल्याने महसुल विभागाने गंभीर दखल घेत नुकसानीचा पंचनामा केला. मात्र सध्या जनावरांच्या चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न हुरसाळे यांच्या समोर निर्माण झाला आहे.
प्रतिनिधी- सुनील थिगळे