वाघोली ग्रामपंचायतीच्या प्रस्थावीत कचरा प्रकल्पाची सचीन बारवकर यांनी केली पाहणी

वाघोली, ११ डिसेंबर २०२०: वाघोली येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाची पाहणी हवेलीचे प्रांत अधिकारी सचिन बरवकर व पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, यानी केली. ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात येणारा कचरा प्रकल्प हा पत्राशेड मध्ये बंदीस्त स्वरुपात करण्यात येणार आहे. त्यामूळे कुठल्या ही प्रकारे पक्षी हानी होणार नाही याची खबरदारी घेऊनच प्रकल्पाचा डीपीआर कलेक्टर साहेबांना दिलेला असल्यामूळेच आज वरिष्ठांनी जागा पाहनी केली.

अहवाल माननीय कलेक्टर यांना देऊन कचराप्रकल्प जागा ग्रामपंचायतीला २ ते ३ दिवसात हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामूळे वाघोली ग्रामपंचायतीच्या मार्फत होनारा कचरा प्रकल्प आता लवकरात लवकर सुरु होईल.

यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे. मा./सरपंच शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, मा. उपसपंच मारुती गाडे, ग्रामविकास अधीकारी आनील कुंभार, तसेच जेष्ठ नागरीक व स्थानिक नागरिक उपस्तीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा