केसनंद गावच्या उपसरपंचपदी सचिन जाधव विराजमान

केसनंद, दि.२३ जून २०२० : केसनंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे, सरपंच अल्काताई हरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सचिन जाधव, यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती ग्रामविकास अधिकारी गणेश वाळकुळी यांनी दिली.

गावचे माजी उपसरपंच प्रणव ढोरे यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी आज (मंगळवारी) ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीला माजी उपसरपंच प्रणव ढोरे, शेखर पाटील, मा. सरपंच मिलिंदनाना हरगुडे, मा. सरपंच प्रणालीताई हरगुडे, मा. सरपंच तानाजी हरगुडे, व ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिक व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर केसनंद ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी केसनंद मध्ये आनंदाचे वातावरण होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा