सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट…

नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२०: गेला महिनाभर राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि गहलोत यांच्या मध्ये हाय वोल्टेज ड्रामा सुरु होता. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात उभे राहिले होते. तसेच गहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. आत्तापर्यंत अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यामधील सुरू असलेला सत्तासंघर्ष कायम आहे की काय असे प्रश्न उठत असतानाच आज काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली.

गेला एक महिना अशोक गहलोत व सचिन पायलट यांच्यामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष व सचिन पायलट भाजपमध्ये जातील की काय अशा सुरू असणाऱ्या चर्चांवर अखेर पडदा पडला आहे. सचिन पायलेटने प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त पीटीआयने काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

सचिन पायलट हे राजस्थानमध्ये आमदारांचा घोडाबाजार करत असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला होता. तसेच यानंतर पोलिसांनी देखील सचिन पायलट यांना नोटीस बजावली होती. या दोन्ही घटनेनंतर सचिन पायलट यांनी पक्षाशी बंडखोरी केली होती. या बंडखोरीमुळे राजस्थानमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. काँग्रेसची सत्ता राजस्थान मधून देखील जाती काय अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. मात्र आज सचिन पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतून सकारात्मक परिणाम दिसून येणे अपेक्षित असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या भेटीबरोबरच सचिन पायलट हे सध्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्याही संपर्कात आहेत. त्यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा