सचिन पोटरे यांची भाजपाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

कर्जत, ३१ जुलै २०२० : भाजपाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी कर्जतचे सचिन पोटरे यांची निवड झाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कर्जत तालुक्यातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे सचिन पोटरे यांनी शिवसेनेच्या विद्यार्थीसेनेतून आपल्या कार्याला सुरुवात केली, पुढे राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांनी मनसेची अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष जबाबदारी सांभाळली, कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील अनेक प्रश्नावर आवाज उठवला.कर्जतच्या एस टी डेपो प्रश्नावर त्यांनी केलेली आंदोलने व त्यासाठी भोगलेला येरवड्याचा जेल कर्जतकरांच्या आजही स्मरणात आहे.

माळढोक पक्षी अभयारण्यासाठी जनहित याचिका, पिकविम्यासाठी आंदोलन, वन विभागातील भ्रष्टाचाराचा पाठपुरावा अशा विविध प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठविला असून अनेक वर्षे पक्षासाठी वेळ देऊन ही मनसेतील वरिष्ठ पातळीवरच्या राजकारणामुळे पक्षात घुसमट होत असल्याच्या कारणाने अस्वस्थ असलेल्या पोटरे यांनी विधानसभेच्या वेळी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर व राष्ट्रवादीचे उमेदवार आ. रोहित पवार यांनी संगनमताने खेळी करत मतदार संघात मनसेचा अनोळखी उमेदवार अचानक दिल्याचा आरोप करत पोटरे यांनी भाजपात प्रवेश केला.

माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला, गेल्या काही दिवसांपासून पोटरेना कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भाजपकडून पोटरे यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे माजी मंत्री प्रा राम शिंदे आणि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरूण मुंडे यांनी अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा