बकरीची नाही, तर मुलांची कुर्बानी द्या..

लखनऊ (उत्तर प्रदेश), २९ जुलै २०२०: भाजपाच्या नेत्यांना सध्या काय झाले हे कळत नाही. आधीच धर्माचे राजकरण करत देशातील अनेक समाजामध्ये ते द्वेष पसरवण्याचे काम तर करत नाही ना? हा प्रश्न उपस्थितीत होत आहे. भारत हा विविध संस्कृती प्रधान देश आहे. ज्या मध्ये सर्वधर्म स्वभाव हा नारा दिला जातो तिथे अलिकडच्या काळात मुस्लिम समाजाचा बकरी ईद सण येत आहे. ज्यामध्ये बक-यांची कुर्बानी दिली जाते. पण, कोरोनाच्या या काळात प्रशासनाने यावर मुस्लिम बांधवाना आवहान करत निर्बंध कमी प्रमाणात लावले याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी एक विवादीत व्यक्तव्य केले आहे.

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कुर्बानी देऊ नये. जर कुर्बानी द्यायचीच असेल आपल्या स्वात:च्या मुलांची द्या, असं वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी लोनी येथे कुर्बानी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सनातन धर्मात आधी बळी दिला जात होता, पण आता त्याऐवजी नारळ फोडला जातो. बकरा कापला जात नाही. त्याचप्रमाणे इस्लाम धर्म मानणाऱ्यांना माझी विनंती आहे. ते देखील आपल्या पवित्र गोष्टीची, आपल्या मुलांचा बळी देत नाहीत. जर कोणी म्हणत असेल मला कुर्बानी द्यायची आहे तर त्याने आपल्या मुलांची कुर्बानी द्यावी, असं नंदकिशोर गुर्जर म्हणालेत.

निर्दोष जनावराचा बळी देऊन त्याचं सेवन केल्याने पुढील जन्मात त्यालाही बकरा व्हावं लागेल आणि लोक त्याला खातील. हा निसर्गाचा नियम आहे. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं असही नंदकिशोर गुर्जर यांनी पुढे म्हटले.

कोरोनाच्या या काळात प्रशासन युध्दपातळीवर काम करत आहे. पण, लोकांंना मात्र धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा न करता अनेक निर्बंध लादत नियमाचे पालन करत साजरा करण्याचे आवहान करत आहे. पण, काही नेते मंडळी हे ज्या पद्धतीने असे विधान करत आहेत ज्यामुळे सामाजामधे द्वेष निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे राज्यातीलच नाही तर देशातील प्रत्येकांने सरकारच्या निर्देशाचे पालन करतच सण साजरे केले पाहिजेत आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याने समाजात तेढ निर्माण होईल असे व्यक्तव्य केले नाही पाहिजेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा