कोल्हापूर, २२ डिसेंबर २०२३ : आपल्या देशामध्ये विविध जाती-धर्माचे लोक हजारो वर्षापासून गुण्या गोविंदाने राहत आहेत. हा सामाजिक सद्भाव आणखी वृद्धिंगत करण्यासाठी सर्व धर्मातील महतांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोल्हापूर मध्ये ‘सद्भावना मंच, कोल्हापूरची’ स्थापना करण्यात आली. या सद्भावना मंचच्या माध्यमाने समाजात परस्पर प्रेम, सलोखा व सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत.
मुस्लिम बोर्डिंग मध्ये आयोजित बैठकीसाठी भन्ते डॉ.कश्यप, कादरभाई मलबारी, डॉ. सय्यद राफिक, ॲड. अकबर मकानदार, बबनराव रानगे, डॉ. राजेंद्र कुंभार, कॉ. धनाजी गुरव, अनिल म्हमाने, डॉ. गिरीश मोरे, वसंतराव मुळीक, मुक्ती आश्रफ, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब भोसले, महेश मछले यांनी आपले विचार मांडले. यावेळी मंचचे पदाधिकारी निवडण्यात आले. अध्यक्ष – डॉ. राजेंद्र कुंभार, उपाध्यक्ष – भन्ते डॉ. कश्यप, सचिव – ॲड. अकबर मकानदार, कार्याध्यक्ष – कॉ. धनाजी गुरव यांची निवड करण्यात आली.
सर्व जाती, धर्मातील लोकांना घेऊन स्थापन करण्यात आलेल्या सद्भावना मंचच्या बैठकीला हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, लिंगायत धर्माचे प्रतिनिधी यांच्यासह सुशीलकुमार कोल्हटकर, महेश वावडेकर, हुसेन भालदार, अंजुम देसाई, नजीर नाईकवाडी जब्बार पटेल, किरण कांबळे, आय. जी. शेख, मुक्ती रब्बानी, प्रविण बनसोडे, रफिक मुल्ला, प्रा. शांताराम कांबळे, अनिल मोरे, वसंत लिंगनूरकर यांच्यासह जमाते इस्लामी हिंदचे व सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर