अयोध्या (उत्तर प्रदेश), ४ ऑगस्ट २०२० : ५ ऑगस्ट रोजी होणा-या अयोध्येतील राम मंदिर भूमिपुजनाच्या कार्यक्रमाची तयारी जय्यत सुरु असून,अयोध्येत उत्साह हा शिगेला पोहचला आहे. तर त्यामध्ये देखील अनेक ठिकाणाहून राम मंदिरासाठी विविध अमूल्य वस्तूचीं भेट दिली जात आहे.
तामिळनाडूतील साधूंनी सोन्या-चांदीच्या दोन विटा आणल्या आहेत, ज्यावर श्री श्री राम तमिळ भाषेत लिहले आहेत, ज्याला रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला दान दिले जाणार आहे.
“आम्ही अयोध्येतील भगवान रामाच्या भव्य मंदिराच्या उद्देशाने दान करण्यासाठी सोन्या-चांदीच्या विटा आणल्या आहेत. तामिळनाडूतील लोकांकडून आम्हाला आर्थिक देणगी मिळाली आणि त्या रकमेसह विटा खरेदी केल्या,” संत मन्नारगुडी जियारस्वामी यांनी सुत्रांना सांगितले. “ट्रस्टने ज्या प्रकारे ते योग्य वाटतील त्याचा उपयोग करणे बाकी आहे. भव्य राम मंदिर बांधले जावे हा आमचा एकच हेतू आहे असे ते बोलले.
सोन्याच्या वीटचे वजन ५ किलो आणि चांदीच्या विटेचे वजन २० किलो असते. पवित्र पुरुष हे तामिळनाडूच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत आणि ‘भूमिपूजन’ मध्ये सहभागी होण्यासाठी अयोध्येत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी करणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी