गोल पोस्ट गुन्हा साध्वी प्रज्ञासिंह यांना पोस्टाने पावडर पाठविणारा संशयित सापडला

साध्वी प्रज्ञासिंह यांना पोस्टाने पावडर पाठविणारा संशयित सापडला

नवी दिल्ली : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना पोस्टाने पाकिटातून पावडर पाठविल्याच्या संशयावरून डॉ. सय्यद अब्दुल रहमान खान याला एटीएसने अटक केली आहे .
खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हे पाकीट महाराष्ट्रातून पाठविण्यात आले होते. या पाकिटात पांढरी पावडर होती. मध्यप्रदेश एटीएस ने त्यानुसार शोध सुरू केला होता.
मध्यप्रदेश एटीएस ने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलिसांनी त्या आरोपीचा छडा लावून त्याला अटक केली.
डॉ. सय्यद अब्दुल रहमान खान हा नांदेड जिल्ह्यातल्या धानेगाव इथला तो रहिवाशी आहे. गेल्या 3 महिन्यांपासून तो पोलिसांच्या रडावर होता. पोलीस सय्यदच्या मोबाईलच्या माध्यमातून त्याच्या लोकेशनवर नजर ठेवून होते. मध्यप्रदेश एटीएसला त्या डॉक्टरचे लोकेशन नांदेड इथे असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढला होता.

error: Content is protected !!
Exit mobile version