चेन्नई : नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अभिनेते कमल हासन यांनी जोरदार निषेध केला आहे.
‘विद्यार्थ्यांविरोधात पोलिसी बळाचा वापर म्हणजे लोकशाहीच्या तोंडात मारण्यासारखं आहे. त्यामुळं लोकशाही ‘आयसीयू’त असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे,’ अशी तोफ हसन यांनी डागली आहे.
चेन्नई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, ‘जामिया’च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मी निषेध करतो. ‘राजकारण हे सर्वव्यापी असतं. त्याचा प्रत्येकावर परिणाम होत असतो. त्यामुळं तरुणांनी शिक्षण संस्थांमध्ये जाऊन केवळ अभ्यास करण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यांनी राजकारण समजून घ्यायला हवं. सत्तेत बसलेल्यांना प्रश्न विचारत राहायला हवं. देशातले तरुण राजकीयदृष्ट्या सजग असतील तर त्यात काहीच चूक नाही. त्यांची मुस्कटदाबी होणार असेल तर लोकशाही धोक्यात घालण्यासारखं आहे,’