सहा वर्षात किती शरणार्थींना दिले भारताने नागरिकत्व?

नवी दिल्ली : पाकिस्तानी, बांगलादेशी व अफगाणिस्तानी नागरिकांना नागरिकत्व देण्याच्या कायद्यावरून देशात गदारोळ सुरू असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकत्वाची आकडेवारी जाहीर केली आहे.
चेन्नई येथील एका कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी मागील ६ वर्षांत किती शरणार्थींना नागरिकत्व दिले, याबाबतची आकडेवारी सांगितली आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, २०१६ ते २०१८ या काळात पाकिस्तानच्या १ हजार ५९५ आणि अफगाणिस्तानच्या ३९१ मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
गेल्या ६ वर्षांमध्ये २ हजार ८३८ पाकिस्तानी, ९१४ अफगाणिस्तानी आणि १७२ बांगलादेशी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. यामध्ये काही मुस्लीम धर्मियांचाही समावेश आहे.
१९६४ पासून २००८ सालापर्यंत श्रीलंकेतून आलेल्या जवळपास ४ लाख तामिळींना भारतीय नागरित्व बहाल करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा