शहीदांविषयी आणि पंतप्रधानांवरील वादग्रस्त विधान ; चेन्नई सुपर किंग्जच्या डॉक्टरचे निलंबन

चेन्नई , १८ जून २०२० : सोमवारी रात्री लडाखच्या गालवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीत २० भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यावर आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चे डॉ. मधु थोटापिलिल यांनी एक वादग्रस्त विधान केले.

यावर कारवाई करत असताना सीएसकेने डॉक्टरला निलंबित केले.एकीकडे देश शहीदांना श्रद्धांजली वाहात होता. त्याचवेळी मधूने केंद्र सरकारवर भाष्य केले आणि ट्विट केले- कॉफिनमध्ये पंतप्रधानांचे स्टिकर असतील का हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे?.

सीएसकेने त्या ट्विटवर दिलगिरी व्यक्त केली . डॉ च्या ट्विटमुळे सर्वत्र राग व्यक्त होताच सीएसकेने कारवाई केली आणि डॉक्टरला निलंबित केले.

सीएसकेने ट्विट केले – डॉ. मधुच्या वैयक्तिक ट्विटची चेन्नई सुपर किंग्जला माहिती नव्हती. त्याला टीम डॉक्टरच्या पदावरून निलंबित करण्यात आले. सीएसके यांनी त्यांच्या ट्विटवर दिलगिरी व्यक्त करत पुढे सांगितले की जे त्याने केले ते व्यवस्थापनाला न सांगताच केले.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा