‘साहित्यकणा फाउंडेशन’, ‘गुणवंत श्रमकला अकादमी’तर्फे महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार

नाशिक, १४ मार्च २०२३ : ‘गुणवंत श्रमकला अकादमी’ व ‘साहित्यकणा फाउंडेशन’ यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. १२ मार्च) कविसंमेलन; तसेच २१ कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम हुतात्मा स्मारक येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
‘दांडेकर इन्स्टिट्यूट’च्या प्राचार्या मानसी देशमुख या उपस्थित होत्या. व्यासपीठावर ‘साहित्यकणा’चे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई; तसेच ‘गुणवंत श्रमकला अकादमी’चे अध्यक्ष विलास गोडसे, अलका कोठावदे, सुभाष गीते, अशोक भालेराव व समाजसेवक अरुण महानुभाव आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कविसंमेलनात ३५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. सुशीला संकलेचा यांची कविता सर्वोत्कृष्ट ठरली. अंजना भंडारी द्वितीय व नीलम श्रीराम यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. रविकांत शार्दूल यांनी कवितांचे परीक्षण केले, गझलकार गोरख पालवे यांच्या ‘आई’ या गझलेला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

अध्यक्षस्थानी बोलताना मानसी देशमुख म्हणाल्या की, ‘साहित्यकणा फाउंडेशन’ कलागुणांना वाव देणारी संस्था आहे, तर ‘गुणवंत श्रमकला अकादमी’ श्रमिकांचा यथोचित गौरव करणारी संस्था आहे, असे कौतुक केले; तसेच
महिलांचा सन्मान म्हणजे महिलांच्या कार्यकर्तृत्वाला बळ देण्याचे काम या दोन्ही संस्था करीत आहेत. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक वाटते.

याप्रसंगी विविध क्षेत्रांतील एकवीस महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अंजना भंडारी, सुरेखा बोराडे, सविता पोतदार, देवयानी सोनार, अश्विनी पांडे, अंजना प्रधान, अख्तार पठाण, स्नेहल देव, अनघा धोडपकर, पूजा बागूल, मृणाल गीते, कोमल पणेर, कु. प्रणाली पंचभाई, नीता गोडसे, मंदाकिनी देवरे, रजनी वाणी, वृषाली मोरे, रेवती वालझडे व प्रीती पाटील, रंजना चिंतावर या महिलांचा गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला; तसेच ‘उमराणा भूषण’ या पुस्तकाचे लेखक, गुणवंत कामगार पोपट देवरे यांचाही सत्कार करण्यात आला. बालकलाकार भार्गवी बागूल हिचे विशेष कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी दैनिक गावकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, अशोक भालेराव, चेतन पणेर, गोरख पालवे, सुभाष उमरकर, माणिकराव गोडसे, राजेंद्र चिंतवार, दिगंबर काकड, योगेश कापडणीस, शरदचंद्र खैरनार, संजय आहिरे, वंदना नागवंशी, अनिल जाधव आदी मान्यवर रसिक उपस्थित होते.

विलास गोडसे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संजय गोराडे यांनी प्रास्ताविक केले व विलास पंचभाई यांनी २१ कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली पंचभाई हिने केले, तर पोपट देवरे यांनी आभार मानले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा