सह्याद्रीचा पाऊस आणि त्या पाऊसात उभा सह्याद्री

विधानसभेचा निकाल काहीही असु देत पण शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातील तरुणांना ही जमणार नाही आश्या गतीने आपल्या पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत.प्रचाराच्या समारोपला मोजून १ दिवस उरला असताना पवार साहेब मात्र आखाड्यात आजुन तळ ठोकून राहील्या चे चित्र दिसत आहे. 
                          पक्षाचे अध्यक्ष मा शरद पवारांची पक्षाचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात सभा होती.या सभेला पावसाने दमदार हजेरी लावली सभा कोलमडेल असेच वाटत होते आणि दुसरीकडे पुण्यात पाऊस झाला तर राज ठाकरेंनी सभा रद्द केली होती.पण ऐकतील ते साहेब थोडीचं. “साताऱ्यात आज राष्ट्रवादी पक्षाचा स्वागताला वरुन राजाने हजेरी लावली आणि साताऱ्या जिल्ह्या २१ तारखेला नक्कीच चमत्कार करेल म्हणत भर पावसात भाषण दिले.
                           काहीही असले तरी ८० वर्षाचा योद्धा अखाडयात सर्वांशी झुंज देताना दिसतोय त्याबरोबरच पायाला दुखापत झाली पण प्रचार थांबला नाही एव्हढंच काय तर सह्याद्रीचा पाऊस या सह्याद्रीवर कोसळून पाणी फेरण्याचे काम केले पण डगमगेल तो पावसातला सह्याद्री काय. आव्हाने अनेक येत आहेत पण शरद पवार साहेबांच्या जिद्दीला काही तोडू शकत नाहीयेत.ना कधी तो थांबला, गडी एकटा निघाला.

2 प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा