गुरूपौर्णिमेला बंदच राहणार शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर

अहमदनगर, दि. ४ जुलै २०२०: शिर्डी येथील प्रसिद्ध उत्सव म्हणून गुरूपौर्णिमेकडे पाहिले जाते. सध्याच्या परिस्थिती मध्ये कोरोनाचे संकट हे संपुर्ण जगात पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे रविवारी (५ जुलै) रोजी साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तसे पत्रही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी (दि.३ जुलै) पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना दिले आहे.

या ठिकाणी होणारी गर्दी पाहून हा निर्णय घेतला आहे. साईच्या दर्शनासाठी सुमारे लाखोंच्या वर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. शिर्डी येथे दरवर्षी गुरूपौर्णिमा उत्सव सालाबादप्रमाणे साजरा होत असतो. यासाठी राज्यभरातून पालख्या साईदर्शनासाठी शिर्डीत येत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाचा रविवारचा गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे.

रविवारी साई मंदिर बंदच राहणार आहे. गुरूपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोणालाही साईदर्शनासाठी दर्शन पास देऊ नयेत, असेही जिल्हाधिकायांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. या निर्णयामुळे साईभक्त हे निराश झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा