शिर्डी : साईबाबा जन्मभूमी पाथरी हेच असल्याचे २९ पुरावे पाथरी साई संस्थानच्या विश्वस्तांनी जाहीर केले. यात विशेष म्हणजे साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाला होता असे शिर्डी संस्थानने प्रकाशित केलेल्या ‘श्री साई चरित’ या ग्रंथातच म्हटलेले होते. मात्र आता हा ग्रंथच गायब झाल्याचे आता सांगितले जात आहे. त्यामुळे वाद अजून चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी येथील संस्थानच्या विश्वस्तांनी साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचे २९ संदर्भ पुरावे जाहीर केले. त्यानुसार विविध संशोधन ग्रंथांत २९ ठिकाणी साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाल्याचा संदर्भ आढळतो. श्री साई चरित ‘द वंडरफुल लाइफ ऍण्ड टीचिंग्स ऑफ श्री साईबाबा’ या इंग्रजी ग्रंथाची हिंदी आवृत्ती साई संस्थानने 1994 मध्ये प्रकाशित केली आहे, मात्र सध्या हा ग्रंथ शिर्डी संस्थानमधून गायब करण्यात आल्याचे सांगितले जाते.
हा मूळ ग्रंथ गोविंदराव रघुनाथ दाभोळकर (हेमाडपंत) यांनी लिहिला असून त्याचा हिंदी अनुवाद शिवराम ठाकूर यांनी केला आहे.