अहमदनगर : राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण विकास विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणातर्फे ‘साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रेचे गुरुवारी (दि.९)रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा घुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राजश्री घुले म्हणाल्या की, सावित्रीच्या लेकी आज फक्त शिकल्याच नाही तर राजकारण, समाजकारण, नोकरी, उद्योग, व्यवसाय या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांना खर्या अर्थाने उन्नत व सक्षम करणारी बचत गट चळवळ अधिकाधिक व्यापक होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण कटिबध्द आहोत.
शिवराज पाटील म्हणाले, नगरमधील या जिल्हास्तरीय प्रदर्शनात ४०० हून अधिक महिला बचत गटांच्या ८०० हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेली गृहपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, लोकरीची उत्पादने, मसाले, सेंद्रीय उत्पादने, कडधान्ये, लाकडी वस्तू, हस्तकला वस्तू, वनौषधी आदी गोष्टी प्रदर्शनात आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, आमदार आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सदस्य सुप्रिया पाटील, सुवर्णा जगताप, उज्ज्वला ठुबे, सुजाता तनपुरे, विमल आगवन, सोनाली साबळे, सोनाली रोहमरे, महेश सूर्यवंशी, शारदा लगड व किरण साळवे आदी उपस्थित होते.