भोकरदन येथे माजी सैनिकांसाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम संपन्न

जालना,भोकरदन ११ ऑगस्ट २०२४ :जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये महसूल विभागा मार्फत १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आसुन त्या पार्श्वभूमीवर तहसिल कार्यालयात “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी सैनिकांची उपस्थिती होती, दरम्यान सैनिकांच्या पाल्याचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सैनिकांच्या अडचणी समजून घेत तहसिलदारांनी अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी सुभाष रगडे तसेच संतोष बनकर, तहसिलदार नरेद्र उखळकर, नायब तहसिलदार महसूल गणेश सपकाळ ,राजेंद्र ताटू, भरत आढाव, संतोष कायटे, जुनेद कोतवाल यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती..

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा