गोल पोस्ट समाजकारण सैनिक संघटनांचा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठींबा

सैनिक संघटनांचा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठींबा

नगर : जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी मौनव्रत आंदोलन सुरू केलेले आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. त्यातच शुक्रवारी (दि.३)रोजी कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांनी त्यांची भेट घेतील असल्याचं समोर येत आहे.त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
राळेगण परिसर व पारनेर तालुक्यातील अनेक आजी माजी सैनिक संघटना आता अण्णा हजारे यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. त्या महिलांचा ही वाटा लक्षणीय असल्याचं समोर येत आहे. अण्णांनी सुरू केलेलं हे आंदोलन महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. सगळ्या महिलांनी या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं असल्याचं अनेक महिलांनी ह्या वेळी बोलताना आपलं मत मांडलं
आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version