गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा अक्षयचा “लक्ष्मीबॉम्ब” मधील लुकची चर्चा

अक्षयचा “लक्ष्मीबॉम्ब” मधील लुकची चर्चा

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अभिनेता अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या आगामी ‘लक्ष्मीबॉम्ब’ या चित्रपटामुळे. आपल्या सवयीच्या वर्तुळातून बाहेर पडत कायमच प्रयोगशीलतेच्या वाटेवर चालणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता अक्षय कुमार याच्या नावाचा उल्लेख केला जातो.
आता देखील ‘लक्ष्मीबॉम्ब’ चित्रपटात त्याने एका ट्रान्सजेंडरची भूमिका बजावताना दिसणार आहे.
एक इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘मला साडीमध्ये सहज आणि सोपं वाटतं.’ असं वक्तव्य त्याने केलं आहे. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. अक्षय नेहमीच नव-नव्या भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतो. आता ही ट्रान्सजेंडरची भूमिका देखील त्याच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version