धाकलगावच्या उपसरपंचपदी सायराबी जमीर शेख यांची बिनविरोध निवड

अंबड, जालना, १९ मार्च २०२४ : जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील मौजे धाकलगाव येथे सरपंच सिता बळीराम शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. मात्र दिलेल्या वेळेत केवळ सायराबी यांचाच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षा सिता बळीराम शेडगे यांनी सायराबी जमीर शेख यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे