नव्या वर्षाची नव्या दिवसाने सुरुवात झाली. अनेकांनी आपल्या मनात संकल्प केले असतील. ते पूर्ण करण्यासाठी काही नियोजन केले असेल.नवा उत्साह आणि ऊर्जा तुमच्या संचारली असेल. मात्र या सर्वांची सुरुवात करताना तुमच्यात कमालीची सकारात्मकता असणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी कोणत्या गोष्टी असणे गरजेचे आहे. याची माहितीही आपल्याला असणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते जाणून घेऊ…
◆ रिकामं मन हे जसे नकारात्मक भावनांचे उगमस्थान आहे. तसेच नैराश्याचे मूळ आहे. त्यामुळे रिकाम्या वेळेत आवडत्या गोष्टींध्ये मन गुंतवून ठेवा. जेणे करून आपण एक सकारात्मक गोष्टीशी निगडित राहू.
◆आपला विचार नेहमी सकारात्मक ठेवा .त्यामुळे आपल्या जीवनाला एक दिशा मिळण्यास मदत होईल.
◆आपल्या मनातील आनंदी भावना मेंदुतल्या सेरेटोनिनची पातळी वाढवते. आणि मनात सकारात्मक भाव निर्माण होतात. त्यामुळे आनंदी रहा.
◆ कोणत्याही समस्येने खचून जाऊ नका तर तिला सामोरे जाऊन बाहेर पडण्याचे मार्ग शोधा. हे एका दिवसाचे काम नाही.
◆कोणतीही गोष्ट करताना ‘मी प्रयत्न करेन’ असं न म्हणता ‘मी ती करेन’ असे म्हणा.
◆ चेहर्यावर नेहमी हास्य ठेवा. सकाळी उठल्यावर स्वत:ला स्माईल द्या आणि त्यानंतर कुटुंबियांना. त्यामुळे आपला दिवस तर चांगला जातोच, परंतु कामही चांगले होते.
◆वेळेचे नियोजन ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ती साध्य झाली की बाकी गोष्टी आपोआप नियंत्रणात येतात.
◆ तुमच्या आजुबाजुला सकारात्मक विचार करणारे असतील याची काळजी घ्या. कारण सकारात्मकता ही माणसाचे जीवन सुखकर करण्यास मदत करतो. तसेच समस्या असणार्या आणि सतत चिडत कुढत रहाणार्या लोकांपासून नेहमी चार हात दूर रहा.