सकारात्मकता आणि मातृत्व

◆मातृत्व हे स्त्री च्या जीवनातील सगळ्यात सुखद असे मानले जाते. इतकी वर्ष गर्भवतीच्या शारीरिक स्वास्थावर आपण लक्ष दिले, पण तिच्या मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक गरजांकडे आपले दुर्लक्ष झाले. गर्भावस्थेचे बाह्यरूप तर आपण व्यवस्थित समजलो, पण त्याचे आंतररूप समजण्यात मात्र चूक केली.

◆आपला स्वभाव, आपल्या भावनांचा विकास, शारीरिक तसेच मानसिक क्षमता; इतकेच नव्हे तर आपल्या सामाजिक संबंधाचा विकासदेखील जन्मानंतर नाही तर आईच्या गर्भातच होऊन जातो.

◆नाळेमार्फत आईकडून येणारा प्रत्येक रासायनिक संदेश बाळाला मिळते असतो. या संदेशाच्या आधारानेच गर्भस्थ बाळ स्वत:ला तयार करीत असते.

◆आईच्या मन:स्थितीवर प्रभाव करणारे घटक; जसे तिचा स्वभाव, सभोवतालचे वातावरण, भोवतालाच्या व्यक्तींचे आचरण यांचे कळत-नकळत परिणाम गर्भवतीच्या मनावर होत असतात.

◆परिणामी तिच्या शरीरात विविध संप्रेरके तयार होतात, जे नाळेमार्फत बाळाकडे पोहचविली जातात. त्यामुळेच गर्भवतीने स्वतः समाधानी, आनंदी आणि मोकळ्या वातावरणात राहायला हवे.

◆ क्रोध, चिडचिड आणि असमाधानी वृत्ती थेट बाळाच्या विकासावर परिणाम करते हे विसरून चालणार नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा