शिक्रापुरात कमी वजनाच्या गॅस सिलेंडरची विक्री, करणाऱ्यांवर गुन्हे दाखल..!

शिक्रापूर: दि. २८ जुलै २०२० शिक्रापूर येथे कमी वजनाच्या गॅसच्या टाक्या विक्री करण्याचा प्रकार काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला व महसूल विभागाने कारवाई करत दहा गॅसच्या टाक्या सिल करत करत शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर मधील मलठण फाटा परिसरात विश्वकर्मानगर मध्ये गॅस वितरण करणारी गाडी आली असताना सदर गाडी चालक अनधिकृतपणे व कमी वजनाचे गॅस सिलिंडर ग्राहकांना देत असल्याबाबत निदर्शनास आल्याने येथील नागरिकांनी शिरूर तहसीलदार कार्यालयात तक्रार केली त्यानंतर शिरूर तहसील कार्यालयातील अतिरिक्त पुरवठा निरीक्षक शहाजी राखुंडे व वैद्य मापक शास्त्र निरीक्षक दु. प्रा. उपरे यांनी शिक्रापूरातील विश्वकर्मानगर मध्ये येत पाहणी केली असता तेथे एमएच १४ एएस ६१३१ क्रमांकाच्या गॅसची गाडी होती.

यावेळी राखुंडे व उपरे यांनी सदर गॅस गाडी चालकाकडे त्याच्या पावत्या व कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले तर चालकाला त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव विकास बिशनोई असे सांगत त्याला रांजणगाव गणपती मधील साई गणेश भारत गॅस एजन्सीचे संचालक हरिश्‍चंद्र कांबळे यांनी गॅस विक्रीसाठी पाठविले असल्याचे सांगितले.

यावेळी अतिरिक्त पुरवठा निरीक्षक शहाजी राखुंडे, व वैद्य मापक शास्त्र निरीक्षक उपरे यांनी वजन काटा उपलब्ध करत त्या गाडीतील याच्या 10% चे वजन केले असता सर्व टाक्याचे वजन कमी असल्याचे आढळून आले.

यावेळी वरील गॅसच्या दहा टक्के याचा पंचनामा करून सर्व टाक्या सील करण्यात आल्या असून याबाबत शिरूर तहसील कार्यालयातील अतिरिक्त पुरवठा निरीक्षक शहाजी ज्ञानदेव राखुंडे, (रा. शिरूर ता. शिरूर जि. पुणे) मूळ राहणार लोणी देवकर ता. इंदापूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी विकास बच्चनाराम बिशनोई, रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे व मूळ रा. जांबा ता. फलौदी जि. जयतपुर राजस्थान) तसेच साई गणेश भारत इजन्सीचे संचालक हरिश्‍चंद्र कांबळे रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करत दहा गॅस सिलिंडर जप्त केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा