महाबळेश्वर, सातारा २१ जुन २०२४ : स्टार सिनेअभिनेता सलमान खान गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये मुक्कामी आहे. महत्वाचं म्हणजे महाबळेश्वर मध्ये तो ज्या ठिकाणी थांबलाय, त्या ठिकाणामुळे ‘भाईजान’ चा मुक्काम वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
भाई की ‘जान’ आणि ‘ती’ धमकी :
धमक्या आणि घरावरील गोळीबारामुळे सलमानला खास पोलिस संरक्षणही पुरवण्यात आले आहे. त्याच्या रक्षणासाठी पोलिसांच्या ताफ्यातील गाड्यासुद्धा सलमानच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत महाबळेश्वरमध्ये मुक्कामाला आहे. ते ठिके, पण वाद कुठे निर्माण होतोय? जाणून घेऊया..
मुख्यमंत्र्यांच्या गावी जाणार होता सलमान
आता सातारा म्हणजे मुख्यमंत्र्यांचं आजोळ गाव.आणि साताऱ्यातील महाबळेश्वर मध्ये भाईजान चं शूटिंग होतं. सलमानचं शूटिंग झाल्यावर तो काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘दरे’ या गावी जाणार होता.मात्र धुक्याने त्याची वाट अडवली आणि त्याला महाबळेश्वर मध्ये एका बंगल्यात थांबावं लागलं.
त्याच बंगल्यात वास्तव्य का?
आता महाबळेश्वर येथे मुक्कामी असताना महत्वाचं म्हणजे सलमान खान ज्या बंगल्यात मुक्कामी आहे तो बंगला कोट्यावधी घोटाळा प्रकरणातील आरोपी वाधवान यांचा आहे. देशातील एका मोठया आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान आणि धीरज वाधवान या भावांचा हा बंगला आहे, त्यामुळेच सल्लू भाईजान अडचणीत आलाय. भाईजान या बंगल्यात का थांबला? असा प्रश्न उपस्थित होतोय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमिता शिंदे