बहिण अर्पिताच्या घरी सलमान खानने केली बाप्पाची आरती

मुंबई, १ सप्टेंबर २०२२: देशभरात सध्या गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटीपर्यंत सर्वांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या घरी थाटामाटात बाप्पाची स्थापना केली आहे. सेलिब्रिटींच्या गणपतीमध्ये चर्चेत असणारं सर्वात लोकप्रिय कुटुंब म्हणजे बॉलिवूड भाईजान सलमान खानच.

दरवर्षी बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी गणपती बाप्पाला थाटामाटात आणतात. बॉलिवूडमध्ये गणेश चतुर्थी जल्लोषात साजरी केली जाते. दरवर्षी त्यांच्या घरी गणपती बाप्पा आणणाऱ्यांमध्ये सलमान खानची बहीण अर्पिता खान देखील सामील आहे. दरवर्षी अर्पिता तिच्या घरी गणपतीची मूर्ती आणते आणि तिला पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी येतात.

दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीला सलमान खान अर्पिताच्या घरी गेला होता. त्याने गणेश चतुर्थीच्या पूजेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आरती करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत सलमान खानने लिहिले – गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओमध्ये सलमान पांढरा शर्ट आणि डेनिम्स जिन्समध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ खूप मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे.

यावर्षी सलमानबरोबर इतरही बॉलिवूडच्या स्टार्सनी अर्पिताच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. रितेश देशमुख आणि जेनीलिया या दांपत्यानेही या घरच्या आरतीमध्ये सहभाग घेतला होता. अभिनेत्री कतरिना कैफ ही अर्पिताच्या फार जवळची आहे त्यामुळे कतरिनाने विकी कौशलबरोबर अर्पिताच्या घरी येऊन गणरायाचं दर्शन घेतलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा