सलमान खान ओटीटीवर करणार पदार्पण, ZEE-5 प्लॅटफॉर्मसोबत ऍक्शन-पॅक सीरिज चा करार

मुंबई २४ मे २०२३: मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार सलमान खान ओटीटीवर एका ऍक्शन थ्रिलर वेब सीरिजमधून डेब्यू करणार आहे. सूत्रानुसार, सलमान खानने ZEE5 सोबत या वेबसिरीज साठी करार केला आहे. त्यामुळे आता वेब प्लॅटफॉर्मवरही चाहत्यांना सलमानचा स्वॅग दिसणार आहे. सलमानला या ऍक्शन-पॅक वेब सीरिजची संकल्पना आवडली आहे आणि त्याने हा प्रकल्प करण्यास होकार दिला आहे. सध्या हा प्रकल्प केवळ प्राथमिक अवस्थेत आहे, त्यामुळे याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. वेब प्लॅटफॉर्म असूनही या मालिकेत सलमानची धमाकेदार ऍक्शन पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

सध्या सलमान फक्त टायगर ३ वर लक्ष केंद्रित करत आहे. या चित्रपटानंतर त्याच्याकडे आदित्य चोप्रा आणि शाहरुख खानसोबत एक बिग बजेट क्रॉसओवर चित्रपट आहे. पठाण विरुद्ध टायगर असे त्याचे शीर्षक आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच सलमान ओटीटी प्रकल्पावर काम सुरू करेल. याबरोबरच सलमान बिग बॉस OTT सीझन २ होस्ट करणार आहे,या शो च्या कामाची सुरवातही लवकरच होईल.या आधी करण जोहरने बिग बॉस OTT सीझन २ होस्ट केला होता. लवकरच ओटीटीवर सलमान आता फिक्शन आणि नॉन-फिक्शन अशा दोन्ही माध्यमातून चाहत्यांसमोर येईल.

फिल्म इंडस्ट्रीतील सूत्रानुसार, काही दिवसांपूर्वी सलमान खानने ZEE-5 सोबत ५ वर्षांचा करार केला आहे. या करारानंतर आता या फ्लॅटफॉर्मला सलमान खानच्या सर्व चित्रपटांच्या प्रसारणाचे अधिकार मिळाले आहेत. या करारांतर्गत येणारा पहिला चित्रपट म्हणजे ‘किसी का भाई किसी की जान’ हा २६ मे रोजी ZEE-5 वर प्रदर्शित होणार आहे. एकीकडे सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत,तर दुसरीकडे सलमान सध्या स्टेज शो मध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याने कोलकात्यात एक मोठा स्टेज शो केला आहे. देशभरात तो हा स्टेज शो करणार आहे असे कळते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा