१ ऑक्टोबर पासून सुरु होणार सलमान खानचा बिग बॉस शो

17

मुंबई, २६ सप्टेंबर २०२२ : छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो “बिग बॉस” १६ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे सध्या या कार्यक्रमात कोणते स्पर्धक असतील, ‘बिग बॉस’ १६ च घर कसं असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

बिग बॉस १६ चा प्रोमो नुकता समोर आला आहे आणि प्रोमो रिलीज झाल्यानंतर आता चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या प्रोमो मध्ये सलमान खान म्हणतो “इन १५ सालो मे सबने खेला अपना अपना खेल, लेकिन अब बारी है बिग बॉस के खेलने की” हे प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये सोळाव्या सीजन विषयी आणखी उत्सुकता वाढली आहे. शो संबंधित अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. सोशल मीडियावर स्पर्धकांच्या यादीची ही जोरदार चर्चा सुरू आहे.

बिग बॉस होस्ट सलमान खान आणि कलर्स वाहिनीने या नव्या कोऱ्या पर्वाचा नवाकोरा प्रोमो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. या प्रोमोनुसार बिग बॉस १६ हा सीजन ०१ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे, यंदाही ‘बिग बॉसच्या’ नवीन सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धकांची संपूर्ण यादी अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. परंतु मीडिया रिपोर्टनुसार मनुव्वर फारुखी या सीझनमध्ये हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील बबीता अर्थात मूनमुन दत्ता आणि फैजल शेख या कलाकारांची नावे चर्चेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा