सलमान खान च्या “या” हिरोइन वर झाला होता बलात्कार…….

मुंबई, २६ फेब्रुवरी २०२१: सोमी अलीचे सलमान खानशी लग्न करण्याचे स्वप्न कधी घेऊन मुंबईत आली होती ,पण तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. चित्रपटसृष्टीतली तिची ओळख सलमान खानची हिरोइन म्हणून मात्र बनली. सोमी अलीची आणखी एक ओळख ती म्हणजे ‘नो मोर टियर्स’ या नावाची ती एक एनजीओ चालवते त्यामुळे,ही संस्था बलात्कार आणि छळ पीडितांना निवारा देते. यशस्वी महिला म्हणून ओळखली जाणारी सोमी अली आज स्वतः बलात्कारातून वाचली आहे. एका दैनिक वृत्तपत्राशी झालेल्या संभाषणात सोमी अलीने तिची शोकांतिका सांगितली आहे.

सोमी अलीने सांगितले आहे की जेव्हा ती पाकिस्तानात ५ वर्षांची होती तेव्हा तिच्या कुक ने तिच्या बरोबर ३ वेळा अश्लील चाळे केले. जेव्हा अभिनेत्री ९ वर्षांची झाली तेव्हा तिच्या चौकीदारानेही तिचा विनयभंग केला.अमेरिकेत राहत असताना वयाच्या १४ व्या वर्षी १७ वर्षाच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला.सोमी अली १६-२४ वर्षेवयोगटा पर्यंत अनेकदा घरगुती हिंसाचाराची बळी पडली. या मुलाखतीदरम्यान स्वत: ला खुलेपणाने सांगणारी अभिनेत्री म्हणाली की आता तिच्या आयुष्याचा हेतू एखाद्याचा जीव वाचविण्याचा झाला आहे. सोमी अली हिने पुढे असेही म्हटले की बर्‍याचदा आपली गोष्ट सांगितल्यानंतर,लोकांच्या टोमणे ऐकाव्या लागतात.

सोमीला सलमान खानसोबत लग्न करायचं होतं आणि असा विचार करून ती भारतात आली होती. १९९१ ते १९९७ च्या दरम्यान सोमीने सुमारे १० चित्रपट अंत, किशन, अवतार, तिसरा कौन, आंदोलन आणि अग्नि चक्र तर अनेक जाहिरातींमध्ये काम केलेल आहे. असे म्हटले जाते की सोमी आणि सलमानचे जवळपास ८ वर्षे अफेयर होते. पण नंतर हे संबंध तुटले.

सलमान खानच्या ब्रेकअपनंतर सोमी अली मियामीला गेले. या मुलाखतीत तिने सांगितले की तिच्या धाकट्या भावाने तिला प्रेरित केले. ज्यामुळे तीने दुसर्यांदा अभ्यास करण्यास सुरवात केली. सोमी अलीने महाविद्यालयीन प्राध्यापकांनीही मदत केली. सोमी अली परत अमेरिकेत गेली आणि मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर ब्रॉडकास्ट पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्या नंतर सामाजिक कार्यात सामील झाली.

सोमीने ‘नो मोर टियर्स’ हि संस्था सुरू केली. घरगुती हिंसाचारामुळे पीडितांना मदत करण्यासाठी तिने ही संस्था सुरू केली. बर्‍याच वर्षांमध्ये, त्यांच्या या संस्थेने हजारो महिला, पुरुष आणि मुलांच्या चेहर्यावर हास्य आणले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा