सलमानचा ‘दबंग ३’ वादाच्या भोवऱ्यात

मुंबई: ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर अगदी सुपरहिट ठरले. आता उत्सुकता आहे ती सलमानच्या दबंग ३ची. सलमानचा ‘दबंग ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सलमान खान आणि सई मांजरेकर यांची केमेस्ट्री दिसत आहे.
मात्र, या चित्रपटातील एका गाण्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
या चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या टायटल साँगमध्ये हिंदूच्या भावना दुखावणारे आक्षेपार्ह सीन्स आहेत, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
दबंग ३ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवा यांनी केले असून त्याची निर्मिती सलमान खान, अरबाज खान व निखिल द्विवेदी यांनी केली आहे.
या चित्रपटामध्ये सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर मुख्य भुमिकेतून दिसणार आहे. येत्या २० डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा