लोणी काळभोर, दि.२० मे २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने दोन महिन्यांपासुन सलुन व्यवसायाला लॉक लागले आहे. ज्याचे हातावर पोट अाहे अशा नाभिक समाजाला कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे या प्रश्नाने वेढलेले आहे.
रेशनिंगवर धान्य तर मिळते परंतू तेल, मीठ, मसाला, साखर, कसे आणायचे व यांसारख्या मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना कसा करायचा असे लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, कुंजीरवाडी, थेऊर, सोरतापवाडी व उरुळीकांचन या भागातील सलून व्यावसायाचे वाटत आहे.
या भागतील ज्याचे हातावर पोट असलेल्या व्यवसायिकांचे सलून कुटुंबाचे पालन पोषण हे रोज होणाऱ्या व्यवसायातून होत असते. परंतू सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन लॉकडाऊन सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासुन सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागात व शहरी भागात सलून व्यवसायिकांच्या काही दुकानात स्वतः एकटेच तर काही दुकानात दोन किंवा चार कामगार काम करत असतात. दुकानात जर एका दिवसाचा ६०० रूपये व्यवसाय झाल्यास त्यातील संबंधीत कामगाराने केलेल्या निम्मे पैसे कामगारास द्यावे लागतात. त्या पैशावर दुकानदार व कामगार आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवतात.
दररोज येणा-या ग्राहकांची संख्या निश्चित नसल्याने कधी – कधी काही वेळेस संपुर्ण दिवसभरात १०० ते २०० रूपयांच्या व्यवसायावरही तडजोड करत कसेबसे सलून व्यवसायिकांना भागवून घ्यावे लागत असते. ग्रामीण भागात दुकानांना काही प्रमाणात कमी भाडे असले तरी तेथील रोजचा होणारा व्यवसायही कमी असतो. शहरी भागात दुकांनाना भरमसाठ भाडे मोजावे लागत असुन अनेकांनी व्यवसायच्या आधारावर बँके कडून कर्ज घेतले आहे. जर कुटुंबात कोणी आजारी असल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च या सर्व अडचणींचा सामना सध्या गेले अनेक दिवसांपासुन व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजाला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड आहे. त्यांना प्रशासनाच्यावतीने रेशनिंग दुकानातून धान्य तर मिळते परंतू एकंदरीतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून नाभिक व्यवसायिकांना फटका बसला आहे. व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर व्यवसायिकांना काम करताना आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षा किट सरकारने द्यावे अशी मागणी नाभिक समाजाकडुन होत आहे.
नाभिक समाजाचा व्यवसाय हा सेवा व्यवसाय असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने गेले ५० ते ६० दिवसांपासुन सलुन व्यवसाय बंद असल्यामुळे समाजासमोर रोजी भाकरीचा प्रश्न उभा राहिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे