समाजशील विद्यार्थी घडविण्यासाठी रासेयो शिबिरे उपयुक्त:हर्षवर्धन पाटील

इंदापूर : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माळवाडी नंबर- २ येथील विशेष हिवाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.
३ जानेवारी ते ९ जानेवारी या दरम्यान विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
या गावातील स्वच्छता, ग्रामीण जीवन, जैवविविधता, बाजार ,भूमी , पाणी, प्राणी याविषयीची माहिती संकलित करणार आहेत तसेच विविध विषयावर जाणीव जागृती देखील करणार आहेत.
शिबिराचे उदघाटन संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी केले. हर्षवर्धन पाटील यांनी आज भेट देऊन, कामाची पाहणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, केवळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शिबिर करावयाचे नाही तर ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, रूढी-परंपरा अनुभवण्यासाठी हे शिबिर उपयोगी ठरतात. विविध परिस्थिती जुळवून घेण्याची कला या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत असते या दृष्टीने जीवन जगण्याचे कौशल्य मिळते. जैवविविधतेच्या बाबतीत चांगले संशोधन आणि कृतीची गरज आहे याविषयीची प्राथमिक माहितीदेखील या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणार आहे.’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे शेलारमामा सुवर्णपदक मिळाल्याबद्दल प्रा. दत्ता रास्ते, श्रीमती. निलीमाताई पवार सुवर्णपदक मिळाल्याबद्दल हर्षदा बारवकर, बेसबॉल मध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल वैष्णवी शिंदे , राष्ट्रीय सेवा योजनेच्या लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाल्याबद्दल कुमार शिंदे यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.संजय चाकणे म्हणाले की,’ हे शिबिर जैवविविधतेच्या दृष्टीने वेगळे आहे. या शिबिराची दखल विद्यापीठबरोबरच राष्ट्रीय पातळीवर देखील घेतली जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय सर्व पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. यावेळी सोनाली चोपडे या स्वयंसेविकेने यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, माजी सरपंच संजय गार्डे, उपसरपंच दत्तात्रय पांढरे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, राजू गार्डे, बापू गार्डे, ग्रामपंचायत सदस्य सतीश मोरे, लक्ष्मण चौधरी, डॉ. शिवाजी वीर,प्रा. मनोहर बेद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. गौतम यादव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. फिरोज शेख यांनी केले. आभार कार्यक्रमाधिकारी रासेयो अधिकारी प्रा. मनीषा गायकवाड यांनी मानले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गौतम यादव, डॉ. गजानन कदम,प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. कल्पना भोसले, प्रा. भारत शेंडे तसेच डॉ. महंमद मुलाणी, प्रा. अविनाश सूर्यवंशी,प्रा. ज्ञानेश्वर शिंदे, प्रा. नामदेव पवार, प्रा. विशाल मोरे, प्रा. सागर भोसले,प्रा. रोहन व्यवहारे, प्रा. दर्शन दळवी, प्रा. पुनम मोहिते, कोमल राऊत यांनी शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा