गुरुग्रामम, १० ऑक्टोंबर २०२२: सपाचे संरक्षक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. मुलायम सिंह यादव यांना नुकतेच मूत्रमार्गात संसर्ग, रक्तदाबाची समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली.
मुलायमसिंग यादव दाखल झाल्यानंतर रुग्णालयात नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच होत्या. रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया रविवारी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्याचवेळी, याआधी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही रुग्णालयात पोहोचून अखिलेश यादव यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी बोलून मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदींनी अखिलेश यादव यांना सर्व शक्य मदत देण्याचं आश्वासन दिलं होते. त्याचवेळी मुलायमसिंह यादव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी राजनाथ सिंहही रुग्णालयात पोहोचले होते.
शेतकरी कुटुंबात जन्म
मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला. त्यांचे वडील साखरसिंह यादव हे शेतकरी होते. मुलायमसिंह यादव सध्या मुलायमसिंह मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. उत्तर प्रदेशचे राजकारण असो, देशाचे राजकारण असो, मुलायमसिंह यादव यांची गणना प्रमुख नेत्यांमध्ये केली जाते. ते तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री होते आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. याशिवाय मुलायम सिंह ८ वेळा आमदार आणि ७ वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आलेत.
मुलायमसिंह यादव यांनी दोन विवाह केले. त्यांची पहिली पत्नी मालती देवी, ज्यांचं मे २००३ मध्ये निधन झालं, त्या अखिलेश यादव यांच्या आई होत्या. मुलायम यांनी साधना गुप्ता यांच्याशी दुसरं लग्न केले. मुलायम सिंह आणि साधना यांच्या मुलाचं नाव प्रतीक यादव आहे. नुकतेच साधना यांचं निधन झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे