खेड तालुक्यातील समर्थ फाऊंडेशनचा “एक हात मदतीचा”

राजगुरूनगर, दि. २५ एप्रिल २०२० : जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे आपला देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे “एक हात मदतीचा” या संकल्पने ने खेड तालुक्यातील समर्थ फाऊंडेशन यांनी समाजातील मोलमजुरी करणारी गरीब कुटुंब ,रोजंदारीवर काम करणारी कुटुंबे ,हातावर पोट असलेला कामगार वर्ग, गरीब व निराधार यांच्यापुढे ज्या जीवनावश्यक वस्तु व अन्न धान्याची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी दररोज अन्न वाटप चालू केला आहे व जीवनावश्यक वस्तूंबाबत मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

समाजातील अनेक सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या कुटुंबांसाठी मदत कार्य करीत आहेतच आणि अनेक दानशूर व्यक्तींचे सेवाकार्य चालुच आहे. परंतु अजुनही मोठ्या प्रमाणात समाजातील या गरीब कुटुंबांना मदत करण्याची खुपच गरज व आवश्यकता आहे. समाजाचा सहभाग व योगदान असल्याशिवाय कुठलेही सेवाकार्य पुर्ण होऊ शकत नाही.
समर्थ फाऊंडेशनमार्फत गेल्या १० दिवसापासून दररोज ३०० लोकांचे जेवण घरपोच देण्याचे काम चाकण परिसरामध्ये चालू आहे. त्याचबरोबर खेड सिटी येथील कन्हेरसर भागात १०० कामगारांना भाजीपाला व अन्न धान्याचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे निमगाव व गोसासी येथे लमाण वस्तीला धन्य वाटप आणि भाजीपाला वाटप करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, माजी सरपंच , बबनराव शिंदे पा. , कन्हेरसरचे सरपंच संदीप दौंडकर, निमगावचे माजी सरपंच संतोष शिंदे पा.,बबन तुकाराम शिंदे , युवराज शिंदे, मनोहर गोरगल्ले, सोपान शिंदे, विठ्ठल गोरडे, समीर अरुडे, मंगेश सोरटे, अजित घारे,महेश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समर्थ फाउंडेशन चे अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील यांनी असेच उपक्रम या भागामध्ये कायमस्वरूपी घेण्यात येतील अशी माहिती दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुनील थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा