संभाजी भिडेंची राजकीय नेत्यांवर जहरी टीका

13

सांगली, ५ ऑक्टोबर २०२२ : आज दसऱ्याच्यानिमित्ताने राज्याबरोबरच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.सांगलीमध्येही शिवप्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे आपल्या वक्तव्यामुळं नेहमीच चर्चेत असतात. तसेच आज कार्यक्रमात भाषण देताना संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवप्रतिष्ठान दुर्गामाता दौड समारोप प्रसंगी संभाजी भिडे म्हणाले की ‘सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे, हा सत्य विचार नसून असत्य विचार आहे. हा इतिहासाला धरून विचार नाही, असं मत व्यक्त केलं आहे.

हे प्रतिनिधी कामाचा पगार घेऊनही देशासाठी काम करताना दिसत नाहीत, असा भिडे यांच्या टीकेचा सूर होता. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती हसत हसत ऐन तारुण्यात दिली. आज आपल्या देशाला केवळ मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहिजेत. तिथचं नेमकी बोंब आहे, असं म्हणत संभाजी भिडेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

पुढे त्यांनी थेट आमदार आणि खासदार यांचा उल्लेख करत टीका केली. नेते मंडळी मातृभूमीसाठी जगणाऱ्या माणसांमध्ये गणले जात नाहीत अशा आशयाचं विधान केलं आहे, ही सोपी गोष्ट आहे… लोक निवडून देतात, ते आमचे खासदार काय? आमदार काय, लोकप्रतिनिधी काय? शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात, भाडोत्री हे बेकार असून आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक आहेत, अशा शब्दांत भिडे गुरुजींनी राजकीय नेत्यांवर जहरी टीका केली आहे.

तसेच भिडे यांनी याच वर्षी मार्च माहिन्यामध्ये करोनाची भीती डॉक्टरांनी पसरवली होती, असे वक्तव्य करत डॉक्टरांचाही अपमान केला आहे. महत्वाची बाब म्हणजे सांगलीत नवरात्रीच्या काळात संभाजी भिडेंच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३५ वर्षांपासून शिवप्रतिष्ठान दुर्गामाता दौडीचं आयोजन केलं जातं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा