गोल पोस्ट कृषी शेतक-यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात

शेतक-यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात

माढा दि.६ नोव्हेंबर २०२० :माढा तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या नावावर केवड येथील बबनराव शिंदे शुगर अलाईड लि.तुर्क पिंपरी या साखर कारखान्याने लाखो रुपये परस्पर कर्ज काढले आहे व त्या शेतक-यांना थकित कर्जापोटी नोटीस आल्या आहेत.

त्या शेतकरी बांधवांनी संभाजी ब्रिगेड कडे धाव घेतली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने बार्शी येथील बँक ऑफ इंडिया शाखा, बार्शी समोर ठिय्या आंदोलन करून जाब विचारण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे माढा विधान सभा उमेदवार दिनेश जगदाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,जिल्हा सचिव सुहास टोणपे,ता कार्याध्यक्ष तथा केवड मा.सरपंच म भारत लटके,करमाळा संपर्क प्रमुख गणेश शिंदे,सुहास काका पाटील मा.सरपंच केवड व शेतकरी बांधव उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version