छत्रपती संभाजीनगरमध्ये कोमल नगर पाडगाव इथे राहणाऱ्या सुरेश श्रीमंत खालापूरे हा पत्नीच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे, पत्नी ने उशीने तोंड दाबून तर प्रियकराने गाला आवळून खून करण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रकार न्युज अनकटच्या सूत्रांकडून समोर आला आहे. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या घरमालकाला आवाज गेल्याने त्यांनी धावत बाहेर येऊन नागरिकांना आवाज दिला. प्रकार समजल्यानंतर नागरिकांना कळताच नागरिकांनी प्रियकराला चांगलाच चोप दिला. पत्नी मुलासह पसार
शीला सुरेश खालापुरे वय ३६ राहणार कोमल नगर पडेगाव, प्रियकर राजू भानुदास खैरे राहणार पैठण अशी आरोपींची नाव आहे. तर सुरेश श्रीमंत खालापुरे वय 42 राहणार कोमल नगर पडेगाव हे फिर्यादी आहेत. सुरेश ह्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, ते स्वतः एक रिक्षा चालक आहेत आणि ते कुटुंबासह कोमल नगर येथे राहतात. त्यांची आरोपी पत्नी शीला खालापुरे ही वाळूज एमआयडीसी मधील कंपनीत काम करते. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे खालापूर यांच्या दोन्ही मोठ्या मुलींचे विवाह झाले आहे. काही दिवसांपूर्वी शीला खालापुरे हिने कंपनीतील काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले होते. आरोपी शीला खालापुरे व राजू खैरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरु होते. या प्रेमसंबंधात शीलाचा पती, सुरेश श्रीमंत खालापुरे हा अडसर ठरत होता, ह्या करणास्थ त्या दोघांनी मिळून शीलाच्या पतीचा खून करायचा प्लॅन रचला.
२ ऑगस्टच्या रोजी पती सुरेश हे जेव्हा आपल्या घराच्या पलंगावर झोपले होते, तेव्हा आरोपी शिलाने मुद्दाम घरातील टेलिव्हिजनचा आवाज मोठा केला ज्याने आत होणाऱ्या झटापटीचा आवाज बाहेर जाऊ शकणार नाही. ह्या नांतर तिने आपल्या प्रियकर राजू खैरे घरात बोलावून घेतले, राजू ने आत येताच घराचे मुख्य दार बंद केले. आरोपी पत्नीने सुरेश यांच्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी राजू खैरे यांनी गळा आवळण्याचा प्रयत्न सुरु केला. तिघांमध्ये झटापट झाल्याने फिर्यादी सुरेश खानापुरे हे भिंत आणि पलंगाच्या मधोमध पडल्याने आरोपींना गळा आवडता आला नाही.
यावेळी आरडा ओरड झाल्याने वरच्या मजल्यावर राहणारे घरमालक विशाल जाधव खाली आले घटनेचा गांभीर्य लक्षात घेता त्यांनी गल्लीतील नागरिकांना आवाज देत बोलावले. हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी आरोपी राजू याला पकडत चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर घाबरलेल्या आरोपी शिलाईने नववर्षाच्या मुलाला घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.याप्रकरणी पत्नी व प्रिय कराविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – संजय आहेर, छत्रपती संभाजीनगर
