संबित पात्राने राहूल गांधीची उडवली खिल्ली, पण नेटीझन्सने त्यांनाच धरले निशाण्यावर….

4

नवी दिल्ली, दि. १६ जुलै २०२०: राजस्थान मध्ये काही दिवसांपासून राजकीय वर्तुळ तापलाचे चित्र दिसत आहे. अश्यातच राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी भाजपात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले. सचिन यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत यांनी प्रथमच मत मांडले. मात्र, मुख्यमंत्री गेहलोत यांनी सचिन यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा नेते आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. 

अशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहे. २०-२० कोटींना आमदारांना खरेदी केलं जात आहे. नवी पिढी हे सगळं बघत आहे. भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला. तसेच, अशोक गहलोत पुढे म्हणाले की, नव्या पीढीवर आमचं प्रेम, येणारे दिवस त्यांचेच आहेत, आमचे सहकारी भाजपाच्या जाळ्यात फसले. भाजपाने कर्नाटक, मध्य प्रदेशसारखा खेळ राजस्थानात रचला असल्याचा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे.

चांगली इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि सुंदर, देखणे दिसणे या सर्व गोष्टी काही उपयोगाच्या नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणं आणि वचनबद्धता काय आहे, कशी आहे, या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात असं असं देखील गहलोत यांनी म्हटले.

गेहलोत यांच्या या वक्तव्याची संबित पात्रा यांनी ट्विटरवरुन खिल्ली उडवली. सचिन पायलट यांना उद्देशून माध्यमांना चांगले बाईट देणे, सुंदर, देखणे असणे हे गेहलोत यांचे वक्तव्य राहुल गांधींशी जोडण्याचा प्रयत्न पात्रा यांनी केला होता. त्यानंतर, अनेकांनी पात्रा यांना टार्गेट केले, तर काहींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.

त्यानंतर, संबित पात्रा यांनी पुन्हा एकदा ते ट्विट रिट्विट करत, मी माझ्या ट्विटमधील काही शब्द काढून टाकत असल्याचे म्हटले. Good Byte & Handsome हे दोन शब्द मी कमी करत आहे, आता तरी ठिक आहे ना? असे म्हणत पात्रा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींची अप्रत्यक्षपणे खिल्लीच उडवली. पात्रा यांच्या या ट्विटवरही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

तसही पात्रा यांना अनेक वेळा नेटीझन्स ने आपल्या निशाणावर धरले होते. नेटीझन्सच काय तर संबित पात्रा हे जेव्हा ही मिडीया मधे काही मुलाखतींना जातात तेव्हा स्वताच तिथे गोंधळलेल्या अवस्थेत बऱ्याच वेळा पाहायला मिळतात आणि मग सोशल मिडियावर त्यांना ट्रोल केले जाते. पात्रा यांच्या या ट्विटवरही संमिश्र प्रतिक्रिया सध्या येत आहेत. 

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा