समीर वर्ल्ड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

पुणे: समीर वर्ल्ड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी २६ जानेवारी रोजी रक्तदान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला समीर वर्ल्ड स्कूलच्या पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. यावेळी ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर एकूण २०९ लोकांच्या डोळ्यांची तापसनी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर सय्यद, स्कूलचे अध्यक्ष अशपाक सय्यद होते.

आज प्रजासत्ताकदिनी सकाळी सात वाजता स्कूलमध्ये स्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच तिरंगा एनिमशन कॉलेजच्या विद्यार्थ्यांन समोर संविधानाचे वाचन करण्यात आले. नंतर स्कूलचे संस्थापक समीर सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी गाईड परेड तसेच कवायतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित गीतांवर नृत्य व गायन करण्यात आले तसेच स्कूल मधील विद्यार्थ्यांनी कराटेचे प्रात्यक्षिक व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तिरंगा कॉलेज ऑफ एनिमेशन चे संचालक पोपट मोहिते व शिक्षकांनी विद्यार्थ्यना प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

आज शाळेने आयोजित केलेल्या स्पेक्ट्रमआय हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने विद्यार्थी व पालकांची डोळे तपासणी करण्यात आली. तसेच पुणे येथील जिल्हा रुग्णालय रक्तपेढी औंध यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले.यामध्ये विद्यार्थी-पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा खुडे तर आभार स्नेहल गाडेकर यांनी केले. यावेळी तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशन चे अध्यक्ष रणजित शिंदे, संचालक पोपट मोहिते, प्राचार्य रवी तिकटे,ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर टिळेकर,डॉ. आलिशाअशपाक सय्यद,सोयल सय्यद,साकिब सय्यद,शहाझेब सय्यद तसेच स्कूलचे प्राचार्य पी. एम. जोसेफ, एडमिनीस्टर शकील शेख हे उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा