गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा समित्यांच्या निवडणुकीत ”महाविकास”चा दबदबा

समित्यांच्या निवडणुकीत ”महाविकास”चा दबदबा

अहमदनगर : जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली.
समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती उमेश परहर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या मीरा शेटे आणि इतर दोन समित्यासाठी क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख, शिवसेनेचे काशीनाथ दाते यांची बिनविरोध निवड झाली.
सभापतीपदाच्या निवडीतही संख्या बसणार नाही, हे लक्षात आल्यानंतर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन होते.
समाजकल्याण समितीसाठी राष्ट्रवादीचे उमेश परहर व भाजपचे सोमनाथ पाचारणे यांनी तर महिला व बालकल्याण समितीसाठी काँग्रेसच्या मीरा शेटे, भाजपच्या दिपाली गिरमकर व शिवसेनेच्या राणी लंके, सुषमा दराडे यानी अर्ज भरले.
इतर दोन समित्यांसाठी क्रातीकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख, शिवसेनेचे काशीनाथ दाते, भाजपचे जालिंदर वाकचौरे, कांतीलाल घोडके, रामहरी कातोरे, शरद झोगडे, अनिल कराळे, शरद नवले यांनी अर्ज भरले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version