भारताच्या वनडे संघात सॅमसनला संधी मिळणार! सौरभ गांगुलीचं मोठ वक्तव्य

मुंबई, ३० सप्टेंबर २०२२ : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये संजू सॅमसन खेळणार नाही तरीदेखील भारतीय क्रिकेट संघात सध्या त्याच्या नावाची खूप चर्चा आहे. दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका बुधवारी २८ सप्टेंबर रोजी सुरू झाली.उभय संघातील एकदिवसीय मालिका ६ ऑक्टोबर पासून सुरू होईल .आणि त्या मालिकेसाठी भारताचा संघ अद्यापही घोषित झाला नाही.

एका कार्यक्रमांमध्ये बीसीसीआय ‘अध्यक्ष सौरभ गांगुली’ यांनी संजू सॅमसन याच्यावर भाष्य केले आहे. त्यामुळे ही बातमी ऐकून त्याचे चाहते खुश होणार आहेत. गांगुली यांच्या दाव्यानुसार संजू सॅमसन हा भारतीय संघाच्या प्लॅनमध्ये आजूनही आहे. त्याचबरोबर सॅमसन चांगला खेळत आहे .तो भारतासाठी खेळला आहे. पण तो विश्वचषकाला मुकला असला तरी मला विश्वास आहे. की तो दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेत सहभागी असेल. व तो जोरदार पूरआगमन करेल .संजू ने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स साठी चांगले प्रदर्शन केले आहे, तो एक चांगला कर्णधार आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.या मालिके साठी दिग्गज शिखर धवन हा भारतीय संघाचा कर्णधार असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा