सॅमसंग गॅलक्सी एम ३१, ६४ मेगापिक्सेल कॅमेरा सह

नवी दिल्ली: लाखो लोकांना काय हवं असतं? नोकरी, चांगला पार्टनर, आनंद आणि फिरण्याची, व्यक्त होण्याची अमर्याद संधी.. पण एवढंच पुरेसं नाही. सध्या प्रत्येक जण फिरतो तेव्हा त्याच्या आठवणी मित्रांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक असतो. या सर्व प्रवासात तुम्हाला खुलवण्यासाठी एका पार्टनरची गरज असते आणि तो पार्टनर आहे स्मार्टफोन. सॅमसंगने ग्राहकांची हीच गरज ओळखली आणि गेल्या वर्षी Galaxy M30s हा दमदार फोन आणला. हा स्मार्टफोन #GoMonster चा परफेक्ट भाग होता. पण २०२० मध्ये कंपनीने Samsung Galaxy M31 च्या MEGA लाँचिंगची तयारी केली आहे.

कंपनीने या फोनची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिली आहे. शिवाय आता MegaMonster ट्रेलर लाँचिंगच्या निमित्ताने Samsung Galaxy M31 विषयी आणखी माहिती उपलब्ध झाली आहे. नयनरम्य ठिकाणी MEGA सेलिब्रिटींसोबतची दृष्य टीझरमधून दिसत आहेत. Samsung Galaxy M31 चा ६४ मेगापिक्सेल कॅमेरा हे या वर्षातलं सर्वात मोठं आकर्षण असणार आहे. सॅमसंगच्या ट्रेलर व्हिडीओने याची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या व्हिडीओमध्ये नयनरम्य दृष्य नजर खिळवून ठेवतात. हा फोन ग्राहकांना कॅमेऱ्यासोबत बरंच काही देणार आहे हे ट्रेलरने दाखवून दिलंय.

ग्राहक यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. पण थांबा, हे एवढंच नाही. बॉलिवूडचे दोन सेलिब्रिटी Galaxy M31 quad लेन्समधून स्वतःला एक्स्प्लोर करत असल्याची हिंट ट्रेलरमधून देण्यात आली आहे. या पोज सॅमसंगच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज आहे. हे पाहण्यासाठी जे युझर्स वाट पाहतील त्यांना Samsung Galaxy M31 देखील पाहायला मिळणार आहे. होय हे खरं आहे. सॅमसंगने ग्राहकांसाठी एक गेमही जाहीर केला आहे, जिथे ग्राहकांना हा MEGA Monster जिंकण्याची संधी मिळेल. कंपनी या MegaMonster ट्रायलच्या काळात एकूण १० Galaxy M31s देणार आहे. यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर अपडेट फॉलो कराव्या लागतील.

Samsung Galaxy M31 चा दमदार क्वाड कॅमेरा आणि 64MP लेन्सेसचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालणार आहेत. शिवाय कंपनीने जाहीर केलेल्या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हालाही फिरण्याची, जग पाहण्याची इच्छा होईल आणि नशिबात असेल तर तुमचा साथीदार M31 असेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा