गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई संदीप देशपांडे यांच्याविरोधात तक्रार दाखल

संदीप देशपांडे यांच्याविरोधात तक्रार दाखल

मुंबई : सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल व पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क परिसरात दीपावलीनिमित्त मनसेकडून रोषणाई करण्यात आली होती. तसंच या परिसरात मनसेकडून कंदिलही लावण्यात आले होते. दीपावलीनिमित्त लावण्यात आलेले कंदील हटवण्यावरूनच संदीप देशपांडे यांचा सहाय्यक आयुक्तांसोबत वाद झाला.
महापालिकेने हे कंदिल काढून कचऱ्यात टाकले. त्यावरुन संदीप देशपांडे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना फैलावर घेतले होते. संदीप देशपांडे यांना १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version