गोल पोस्ट महाराष्ट्र जालना तालुक्यातील पाहेगाव येथील संदीप गाडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून केली...

जालना तालुक्यातील पाहेगाव येथील संदीप गाडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून केली आरक्षणाची मागणी…

जालना, १७ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणाची धग आता चांगलीच पसरली असून अद्याप सरकारने काहीच निर्णय न दिल्याने मराठा समाजातील तरुण वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसत आहे. जालना तालुक्यातील पाहेगाव येथील युवक संदीप गाडेकर यांनी मराठा आरक्षण २० तारखेच्या अगोदर मिळावे या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्क रक्ताने पञ लिहिले आहे. २० तारखेला मराठा समाज मुंबईकडे कूच होण्याची तयारी करत असून अद्याप ठोस निर्णय न आल्याने मराठा युवकाने अशा प्रकारे आपल्या भावना मुख्यमंत्र्यंपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version