सांगली बंद वर सुप्रिया सुळेंचा आरोप

पुणे: आज संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेनं सांगली बंद पुकारले आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्राचे ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी पुकारला गेलेला या सांगली बंद राजकीय षडयंत्र आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

याबाबत सुळे यांना विचारलं असता, हा बंद चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मुख्यमंत्री आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. नेमका त्याच दिवशी हा बंद पुकारण्यात आलाय. यामागे निश्चितच राजकीय षडयंत्र आहे, असं त्या म्हणाल्या. ‘ज्या शिवछत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं. त्यांच्या नावाचा वापर करून बंद करणं मला अयोग्य वाटतं,’ असं त्यांनी भिडे यांना नाव न घेता सुनावलं. ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं.

त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे.
वाचा: संजय राऊत यांना पदावरून हाकला; संभाजी भिडे भडकले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा