सांगली, दि.१२ जून २०२० : सांगली जिल्ह्यातील इरळी येथील सलून व्यावसायिकाने आपल्या मुलासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचे संकट असल्याने सध्या लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने या सलून व्यावसायिकांने टोकाचे पाऊल उचलले, असल्याची माहिती समोर येत आहे.
नवनाथ उत्तम साळुखे (वय ३५) असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याचा मुलगा अजय साळुंखे (वय ४) या लहनाग्याला त्यांने विषारी औषध पाजल्याचे सांगण्यात येत आहे.
या दोघांनाही सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सलून व्यवसाय बंद आहे. या काळात शासनाने सलून व्यावसायिकांना तांदूळ आणि गहू याव्यतिरिक्त काहीच दिले नाही. घरचा इतर खर्च कसा करायचा हा प्रश्न त्याच्यासमोर होता. लॉकडाऊनमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे हा व्यावसायिक तणावाखाली होता.
कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील नवनाथ साळुंखे हा सलून व्यावसायिक असून त्याला पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
न्युज अनकट: