जयसिंगपुर, २२ ऑक्टोब र२०२२: शिरोळ तालूक्यात ढगफूटी झाली असून त्यामुळे सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. हा पाउस एवढा जोरदार होता की ढगफुटी झाल्याप्रमाणे तब्बल दीड तास विजेच्या कडकडाटासह बरसत होता.
या मुसळदार पावसामुळे शिरोळ तालूक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने महामार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर उदगाव-रेल्वे स्टेशन चिंचवड-शिरोळ तालूक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
जयसिंगपुर शहरातील अनेक घरात आणि दुकानात पाणी गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दीड तासांत ११८ मीलीमीटर पाऊस पडल्यामुळे शिरोळा, जयसिंगपुर, उदगाव, चिंचवड यासह परिसरातील शेतात पाणीच पाणी साचले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर