गोल पोस्ट स्पॉटलाइट या पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे सानिया आणि शोएब चा घटस्फोट?

या पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे सानिया आणि शोएब चा घटस्फोट?

पुणे ,१२ नोव्हेंबर २०२२ : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी सानियाच्या एका इन्स्टा पोस्टमुळे हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं होत. त्यानंतर त्यांच्या जवळच्या एका मित्रानं सानिया आणि शोएब यांच्या नात्यांबाबत चर्चावर शिक्कामोर्तब करत ते दोघेही विभक्त झाल्याचं सांगितलं होतं.

काही पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री आयशा उमर शोएब आणि सानिया यांच्यातील नातं तुटण्यास कारणीभूत असल्याचं बोललं जातं आहे. शोएब मलिक सध्या आयेशा उमर ला डेट करत आहे.

उमर हि पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री आहे. आयेशाने २०१५ मध्ये ‘कराची से लाहोर’ या सिनेमांतून पदार्पण केलं. तिला ‘जिंदगी गुलजार है’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या यलगार या सिनेमात हि आयशानं काम केलं. त्यानंतर २०२१ मध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी मासिकेसाठी आयशा आणि शोएब यांनी एक फोटोशुट केलं होतं. ते फोटोज खूपच बोल्ड होते आणि त्यांची केमिस्ट्री हि प्रेक्षकांना खुप आवडली होती. त्यानंतर या दोघांची जवळीकता आजून वाढत गेली. आणि याचं कारणांस्तव सानिया नाराज असल्याचं बोललं जात आहे.

सध्या शोएब मलिक पाकिस्तानात आहे. एका स्पोर्ट्स चॅनेलसाठी तो टी २० वर्ल्डकप संबधित काम करत आहे. तर सानिया दुबईत आहे. या दोघाचं लग्न २०१० मध्ये झालं होतं. दोघाच्या लग्नाला आता १२ वर्ष झाली आहेत या लग्नातून दोघांना एक मुलगादेखील आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version